- Home
- Articles
- MPSC
- भाषेतील रस
मराठी व्याकरण - भाषेतील रस
रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.
साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.
मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.
साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.
१) स्थायीभाव - रती
रसनिर्मिती – शृंगार
हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन
उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.
२) स्थायीभाव – उत्साह
रसनिर्मिती - वीर
हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात
उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’
३) स्थायीभाव –शोक
रसनिर्मिती – करुण
हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात
उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!
४) स्थायीभाव – क्रोध
रसनिर्मिती – रौद्र
हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन
उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.
५) स्थायीभाव – हास
रसनिर्मिती – हास्य
हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.
उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.
६) स्थायीभाव – भय
रसनिर्मिती- भयानक
हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.
उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.
७) स्थायीभाव – जुगुप्सा
रसनिर्मिती – बीभत्स
हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.
उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.
८) स्थायीभाव – विस्मय
रसनिर्मिती- अदभुत
हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात
उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.
९) स्थायीभाव – शम (शांती)
रसनिर्मिती – शांत
हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.
उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !
प्रा. अभिता निकम
MA (Marathi), SET (Marathi), M.Ed.
Download Marathi Samnyadnyan Test App
The Marathi General Knowledge preparation app is beneficial for getting ready for MPSC, aptitude tests, and recruitment exams, among other assessments.
Click here to Download
Your Comment:
(6) Comments:
|
LALITKUMAR DEORE |
Commented On: 04-Jan-2018 |
far sundr exmple devun sarani marathil ras ha subject patvun dila aahe
|
MAYURI CHAUDHARI NASHIK. |
Commented On: 09-Nov-2017 |
Very nice information about Marathi Grammar .
Thanks, Nikam mam....
|
OM |
Commented On: 06-Oct-2017 |
खुप छान मार्गदश आहे टिचर मला आवडल मी माझ्या मित्रानां शेयर करीन
|
सु®@ज भेK@रे |
Commented On: 13-Jul-2017 |
|
LAXMI MORE |
Commented On: 11-Jul-2017 |
|
LAXMAN KHATING PATIL |
Commented On: 11-Jul-2017 |
Very nice information about Marathi grammar