- Home
- Articles
- MPSC
- शृंगार रसाचे उपप्रकार व उदाहरणे
मराठी व्याकरण - शृंगार रसाचे उपप्रकार व उदाहरणे
(शृंगार)- शृंग म्हणजे कामवासना
मानवी मनात ‘प्रेम’ ही भावना किंवा ‘रती’ हा ‘स्थायी भाव’ कमी-अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेत असतो. कथा कविता कादंबरी वाचताना व चित्रपट-नाटक पाहताना मनातील कामवासना जागृत होते व शृंगार रसाची निर्मिती होते.
शृंगार रसाचे उपप्रकार
१) उत्तान शृंगार
कवितेचे किंवा गद्याच्या एखाद्या ओळीतुन अथवा वाक्यातुन मानवी मनातील वैषयिक भावना जागृत होते.
उदा:-
- गडगडाट झाल्यावर ती अशोकला बिलगते. अशोक तिला जवळ घेतो, तिच्या तोंडावरून हात फिरवतो.
- तू मला फार आवडतोस केवळ तू दिसावा म्हणून मी खेळ पाहत बसते रविवारी शाळा बंद असली की,
मला करमत नाही.
- तुझे गरम ओठ ओठावर टेकलेस तेव्हा
तेव्हाही रात्र अशीच होती.
- काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत I I
२) सात्त्विक शृंगार
कवितेच्या ओळीतुन किंवा वाक्यातुन सोज्वळ किंवा सात्त्विक प्रेमाचा अनुभव येतो.
उदा:-
- घर ही सुंदर गोष्ट आहे आणि बायकोला घरवाली म्हणण्यात फार काव्य आहे.
- असे तुझ्याशी बोलावे हे ठरवुनी आलो मनात काही आणिक तुझिया नेत्री दिसले, बोलायचे तसे तुलाही I
- तिच्या अंगावर आपली नजर टाकायची पण तिला कळणार नाही...जाणवणार नाही याची काळजी घ्यायची.
- सहज तुझी हालचाल मंत्रे जणू मोहिते.
३) विप्रलभ शृंगार
प्रियकर किंवा प्रेयसीच्या विरहाने, आठवणीने हा रस निर्माण होतो.
उदा:-
- या कातरवेळी पाहिजेस तू जवळी.
- नवऱ्याला आपण बिछान्यात सुखी ठेवू शकलो नाही, तसे कधी कोणी शिकविले ही नाही नवरयाने तो प्रयत्न केला पण संकोच आणि अज्ञानामुळे आपल्याला ते जमलेच नाही पण आज त्याची आठवण येऊन ती भावना तिच्या शरीरभर सरसरत जाते.
- आणिक तुझिया लाख स्मृतिंचे
खेळवीत पदरात काजवे.
उभे राहुनी असे अधांतरि
तुजला ध्यावे तुजला घ्यावे.
- तुझ्याशिवाय जगण तर सोडच,
मरणसुद्धा कठीण आहे.
उरलेल्या प्रत्येक श्वासात
आत अखंड जलणं आहे.
प्रा. अभिता निकम
MA (Marathi), SET (Marathi), M.Ed.
Your Comment:
(5) Comments:
|
SONALI JADHAV |
Commented On: 19-May-2019 |
Marathi grammar ajun khi means sandhi pn havay pn tri he khup shikle
|
GANESH GURAV |
Commented On: 30-Jan-2018 |
खूप छान आहे आणि उदाहरण तर लयभारी
|
ROHINI SHENDKAR |
Commented On: 05-Aug-2017 |
मस्त छान माहिती आहे उदाहरणे तर अगदी अप्रतिम आहेत फारच छान.
|
ROHINI SHENDKAR |
Commented On: 05-Aug-2017 |
|
ARUN EKNATH BADAKH |
Commented On: 20-Jul-2017 |
VHERI NICE
प्रा. अभिता निकम
MA (History), SET (Marathi), M.Ed.