- Home
- All Blogs
-
तलाठी भरती परीक्षा 2023
तलाठी भरती परीक्षा 2023
Published On:
6/7/2023
Author:
Admin
तलाठी भरती परीक्षा म्हणजे काय?
महाराष्ट्रात महसूल आणि वन विभाग यांच्या अंतर्गत तलाठी भरती घेतली जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती असते या समितीतर्फे तलाठी गट क या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते व ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात या भरतीसाठी महाराष्ट्रातील युवक मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात
तलाठी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय?
सर्वप्रथम उमेदवाराला मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आह तलाठी पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले असावी किंवा समतुल्य जाहीर केलेली अन्य आर्यता उमेदवाराने उत्तीर्ण केलेली असावी
संगणकाचे ज्ञान आवश्यक असून संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उत्तीर्ण झालेले नसेल तर तर दिलेल्या मुदतीत ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे
तलाठी भरतीसाठी वयोमर्यादा किती असते?
तलाठी भरतीची जाहिरात
प्रसिद्ध प्रसिद्धीच्या दिवशी उमेदवाराचे वय 18 पेक्षा कमी व 33 पेक्षा
जास्त असावे मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 38 वर्ष अशी
राहील
तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप
तलाठी पदासाठी लेखी
परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असेल या परीक्षेत एकूण शंभर
प्रश्न असतील प्रत्येक प्रश्न दोन गुण असे मिळून एकूण 200 गुण असतील.
तलाठी भरती परीक्षेचे अभ्यास घटक
तलाठी
भरती परीक्षेत चार महत्त्वाचे अभ्यास घटक आहेत बौद्धिक चाचणी इंग्रजी,
सामान्य ज्ञान आणि मराठी. यातील सामान्य ज्ञान या अभ्यास गेट घटकाची
व्याप्ती भरपूर आहे यात महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्र विषयक सामान्य
ज्ञान आधुनिक भारताचा इतिहास समाजसुधारक नागरिकशास्त्र चालू घडामोडी
महाराष्ट्रातील जिल्हे यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे गुणवत्ता यादीत
स्थान मिळवायचे असेल तर या चारही घटकांचा सखोल अभ्यास महत्त्वाचा आहे
अभ्यास करताना मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणे सुद्धा फलदायी
ठरते.
तलाठी भरती परीक्षेचा दर्जा
तलाठी भरतीसाठी पदवी ही
कमीत कमी अर्हता असल्यामुळे शासन निर्णयानुसार या परीक्षेतील प्रश्नांचा
दर्जा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जा
समान राहील. परंतु मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा माध्यमिक
शालांत परीक्षेच्या दर्जा समान राहील
#talathi #talathi_bharti
Your Comment:
(0) Comments: