Updates

नेट परीक्षा - अनिवार्य पेपर क्रमांक-१

MH SET 2016 OMR Sheet

विद्यापीठ अनुदान आयोगाने वरिष्ठ महाविद्यालयांतील अध्यापाकांसाठी अनिवार्य केलेली नेट पात्रता परीक्षा येत्या १० जूलैला सर्वत्र पार पडणार आहे. NET म्हणजेच National Eligibility Test ही परीक्षा तुम्ही ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेत त्या विषयातून देता येते. नेट ही परीक्षा इंग्रजी किंवा हिंदी या दोन माध्यमातून देता येते. नेट परीक्षेला सामोरे जाताना आपल्याला ३ पेपर द्यावे लागतात.

पेपर १ हा सर्वांनसाठी अनिवार्य असतो. तर पेपर क्रमांक २ व ३ हा उमेदवाराने निवडलेल्या ऐच्छिक विषयाशी संबंधित असतो. आज आपण पेपर क्रमांक १ विषयी सखोल चर्चा करूया.

पेपर क्रमांक - १ या प्रश्नपत्रिकेत एकूण ६० प्रश्न विचारले जातात त्यापैकी कोणतेही ५० प्रश्न सोडवायचे असतात. जर तुम्ही ५० पेक्षा अधिक प्रश्न सोडविलेत तर पहिले ५० प्रश्नच तपासले जातात.प्रत्येक प्रश्नाला ४ पर्याय दिलेले असतात.त्यापैकी योग्य पर्यायाची निवड करायची असते प्रत्येक प्रश्नाला २ गुण असा एकूण १०० गुणांचा हा पेपर असतो.

पेपर क्रमांक १ मध्ये एकूण १० घटकांचा समावेश करण्यात आला आहे.प्रत्येक घटकावर ५ प्रश्न म्हणजेच प्रत्येक घटकाला १० गुण अशी आखणी करण्यात आली आहे.

विभाग-१ अध्यापनविषयक दृष्टीकोन (Teaching Aptitude) :

उमेद्वारचा अध्यापन विषयक दृष्टीकोन यातून पहिला जातो. यामध्ये अध्यापानाची उद्दीष्ट , अध्यापनाच्या पद्धती, शैक्षणिक साधने, मूल्यमापन पद्धती अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये, अध्यापन कौशल्य , शैक्षणिक साधने अशा विविध घटकांवर प्रश्न विचारले जातात. एकंदरीत तुमचा शिक्षणविषयक दृष्टीकोन कसा आहे ? तो अध्यापनास उपयुक्त आहे का? हे या प्रश्नांमधून तपासले जाते.

विभाग-२ संशोधनविषयक अभियोग्यता (Research Aptitude) :

शिक्षक हा नेहमीच संशोधक असला पाहीजे. बदलत्या काळानुसार येणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी तो उष्कृष्ट संशोधक असावा. यामध्ये संशोधनाचा अर्थ, वैशिष्ट्ये, पद्धती,तत्त्वे,संशोधनातील पायऱ्या , संशोधनाचा आराखडा , संशोधन अहवाल लेखनाची पद्धती , कार्यशाळा , चर्चासत्र , परिसंवाद या विविध घटकांचा समावेश असतो.

विभाग-३ उतारे व त्यावर आधारित प्रश्न (comprehension) :

या विभगात उतारे दिले जातात आणि त्या उताऱ्यावर आधारित प्रश्न विचारले जातात.उताऱ्यावरील प्रश्न सोडविताना उतारा काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे . हा विभाग वाचनक्षमतेच्या आकलनावर आधारित आहे. प्रश्नांची उत्तरे उताऱ्यामध्ये दडलेली असतात.तुम्हाला ती उत्तरे शोधण्याचे तंत्र लक्षात आले की या विभागात पूर्व गुण मिळू शकतात.

विभाग-४ संदेशवहन (Communication) :

उत्तम शिक्षक होण्यासाठी आपल्याजवळ असणारे ज्ञान विद्यार्थ्यापर्यत पोहचविण्यासाठी योग्य संदेशवहनाची आवश्यकता असते. मग संदेशवहनाचे घटक , वैशिष्ट्ये , प्रकार , अडथळे, संदेशवहनाची साधने या विविध घटकांचा अभ्यास आपल्याला या विभागात करायचा आहे.या विभागात अगदी काही नेहमीच्या वापरातील शब्दांची संक्षेप रूपे देखील विचारली जातात.

विभाग- ५ व ६ अंकगणितीय व तर्कशास्त्रीय युक्तिवाद (Mathematical & Logical Reasoning) :

या विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी सरावाची आणि तंत्राची आवश्यकता पडते.या मध्ये सारखेपणावर आधारित प्रश्न , नातेसंबंध, वर्गीकरणावर आधारित प्रश्न , गणिती युक्तिवाद , तर्कशास्त्रीय युक्तिवादावर आधारीत प्रश्न असतात. जास्तीत जास्त सरावाने या विभागातील प्रश्न बरोबर सोडविता येतात.

विभाग- ७ आकडेवारी विश्लेषण (Data Interpretation) :

हा विभाग आकडेवारी विश्लेषणावर आधारित आहे. यामध्ये तक्तावाचन , गुणात्मक व संख्यात्मक विश्लेषण , स्तंभवाचन अशा विविध घटकांचा समावेश केला जातो.

विभाग - ८ माहिती व संदेशवहन विभाग (Information & Communication Technology) :

आजच्या माहिती,तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाबाबत आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. या विभागात माहिती तंत्रज्ञानाचे फायदे, माहिती तंत्रज्ञानाच्या मर्यादा , संगणक व ई-मेलची मूलभूत माहिती, ई-कॉमर्सचे फायदे , संगणक क्षेत्राशी संबंधित विविध शब्दसंक्षेप, वैज्ञानिक संस्था व संज्ञा अशा विविध घटकांचा समावेश होतो. रोजच्या वापरात आपण संगणकाशी संबंधीत असल्यास नवीन माहिती आपल्याला प्राप्त होते याचा वापर हा विभाग सोडविताना होतो.

विभाग- ९ जनता व पर्यावरण (People & environment) :

या विभागात पर्यावरण जागृती विषयक दृष्टीकोन अभ्यासला जातो. नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रकार, प्रदूषणाचे प्रकार, त्याचे परिणाम, पर्यावरण विषयक कायदे, तसेच भूगोल विषयाचा देखील अंतर्भाव केला जातो.

विभाग- १० उच्च शिक्षण प्रणाली - शासनप्रणाली व प्रशासन (Higher Education System-governance administrator) :

या विभाग उच्च शिक्षण प्रणालीच्या शासन व प्रशासनाशी संबंधित आहे. अनौपचारिक व इतर शिक्षण, मूल्य शिक्षण, तंत्रशिक्षण, विद्यापीठ अनुदान आयोग, विद्यापीठाचे प्रकार, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचा समावेश होतो.

अशाप्रकारे वरील विभागावर आधारित पेपर क्रमांक १ असतो. नेहमीचे वाचन, तंत्र आणि सराव याआधारावर पेपर क्रमांक एक तुम्हाला यशस्वीरीत्या देता येईल. पेपर मध्ये तुम्हाला ठाम माहीत असणारे ५० प्रश्न सोडवा. वेळेचे नियोजन योग्य केल्यास पेपर निश्चित वेळेत पूर्ण होतो. यांमध्ये जास्तीत जास्त गुण संपादीत करण्यासाठी सरावाला जास्त महत्त्व द्या. या धकाधकीच्या जीवनात प्रवासाच्या वेळेत Net परीक्षेचा सराव करण्यासाठी तुमच्यासाठी आम्ही GoPract Website घेऊन आलो आहोत. यामध्ये पेपर क्रमांक १ साठी इंग्रजीमध्ये सराव प्रश्न देण्यात आले आहेत. तर पेपर क्रमांक २ व ३ साठी History , Political Science, English , Computer Science , Psychology , Commerce , Education , Law या विविध विषयांचे प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत.

Search UGC NET Books

UGC NET Marathi Books

Your Comment:
Name :
Comment :
(3) Comments:
D  DHANASHREE Commented On: 31-Jan-2018

Sir yat Pali language cha samacesh nhiye ... Please tyachi pn practice test available krun dya..

S  SMIRA Commented On: 22-Aug-2016

i want pass the net exam

S  SANDIP KALYAN BANSODE Commented On: 21-Jul-2016

MPSC Test slove

Upcoming Exam Forms

Subscribe to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more on Whatsapp!

Subscribe to Gopract Updates!

Advertisement

LAW CET

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result