Updates

Maharashtra B.Ed CET 2016


नमस्कार ,

ज्ञान दानाच्या क्षेत्रात ज्यांनी आपले पाऊल ठेवण्याचा विचार केला आहे अश्या सगळ्यांना सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा. B.Ed करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला B.Ed CET परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. येत्या १२ जुन ला ही परीक्षा ऑंनलाईन होणार आहे. हा पेपर एकूण १०० गुणांचा असणार आहे. यासाठी १ तास ३० मि. वेळ असणार आहे. या पेपरमध्ये ३ भांगाचा समावेश होणार आहे.

  1. मानसिक क्षमता (MENTAL ABILITY) – यातील प्रश्न हे युक्तिवादावर आधारित असतील. यामध्ये सांकेतिक भाषेशी संबंधित प्रश्न, नातेसंबंध,वर्गीकरणानावर आधारित प्रश्न, दिशा तर्कशास्त्र अशा विविध प्रश्नाचा समावेश असेल.दिलेल्या पर्यायांचा योग्य विचार केल्यास आपण उत्तरा पर्यंत निश्चित जावू शकतो.
  2. सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE) – यामध्ये तुम्हाला चालूघडामोडीबद्दल किती ज्ञान आहे याची तपासणी केली जाते.त्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घटना, इतिहास, भूगोल,नागरिकशास्त्र,राज्यशास्त्र,साहित्य,तंत्रज्ञान याविषया संबंधीत वाचन करावं.
  3. शिक्षकांचा दृष्टीकोन (TEACHERS APTITUDE) - या भागातून तुम्ही शिक्षक होण्यासाठीच्या तुमच्यात असलेल्या क्षमतांची चाचणी घेण्यासाठी प्रश्न विचारले जातील.तुमचा शिक्षणविषयक असलेला दृष्टीकोन,तुमच्यातले नेतृत्व गुण, शिक्षण क्षेत्रातील बदलांची माहिती,व्यावसायिक बांधिलकी अशा विविध घटकांवर या विभागात प्रश्न विचारले जातील.

अशा पद्धतीने एकूण १०० गुणांचा हा पेपर असणार आहे. विचारपूर्वक योग्य पर्यायांचा विचार केल्यास तुम्ही अचूक उत्तर निवडू शकता.यासाठी शिक्षण क्षेत्रात येताना आपला एका सकारात्मक दृष्टीकोन घेवून तुम्ही हही परीक्षा द्या.बदलत्या काळात आपण अनेक बदलांना सामोरे जात आहोत. शिक्षण क्षेत्रात देखील नवनवीन आव्हानांना पेलण्याची क्षमता आपण आपल्यामध्ये निर्माण करायला हवी. याचसाठी B.Ed ला प्रवेश घेण्यापूर्वी तुमच्या क्षमतांची ही परीक्षा घेण्यात येत आहे. तुमच्या शिक्षणाविषयाच्या दृष्टीकोनाची चाचणी घेणे हा या पात्रता परीक्षेमागील मुख्य उदेश आहे. सकारात्मक विचारांनी परीक्षेला सामोरे जा समाज घडविणाऱ्या शिक्षकी पेशाच्या अभ्यासक्रमाची ही पहिली पायरी आहे. ती तुम्हाला यशस्वीतेकडे नेवो याच शुभेच्छा.

Search B.ED CET Books

Search B.ED CET Marathi Books

Your Comment:
Name :
Comment :
(1) Comments:
P  POOJA Commented On: 01-Mar-2024

good

Upcoming Exam Forms
Gopract App is available now on Play store. Download Android App from Playstore now!
Gopract : Your Exam Prep guide

Download app to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more!

Download App for Gopract Updates!

Subscribe to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more on Whatsapp!

Advertisement

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result