NET परीक्षा मार्गदर्शन

एखादी परीक्षा म्हटली की पहिलं येत ते दडपण आणि तिथेच चुकतो आपण. कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना त्या परीक्षा पद्धतीची, विषयाची सखोल माहिती घेऊन योग्य पद्धतीने केलेला अभ्यास हा आपल्याला नक्कीच यशापर्यत घेऊन जातो. Net परीक्षा ही असच काहीस वातावरण निर्माण करते दरवर्षी वर्षातून दोनदा विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (NET) आयोजन करते. या परीक्षेचा निकाल फार कामी लागतो इथुनच आपण सुरवात करतो. पण अस न करता पहिल्याच प्रयत्नात आपण ही परीक्षा पास कशी करावी याबाबत विचार करणे गरजेच आहे. याच उद्देशाने पुढील काही महत्त्वपूर्ण बाबी लिहित आहे.

१) सखोल अभ्यास:-

परीक्षेला सामोरे जाताना त्या विषयाच्या सर्वं पैलूंचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे . त्या विषयाच्या प्रत्येक घटकाची सखोल माहिती आपण प्राप्त करायला हवी. NET परीक्षेसाठी तुमच्या POST GRADUTION च्या अभ्यासावर भर द्यावा. प्रत्येक घटकावर विशेष लक्ष द्यावे.

२) पेपर स्वरूप:-

परीक्षेमध्ये आपण निवडलेल्या विषयाचे ३ पेपर असतात पेपर क्रमांक १ हा १०० गुणांचा असतो. त्यामध्ये एकूण ६० प्रश्न असतात त्यापैकी ५० प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. पेपर क्रमांक २ हा १०० गुणांचा असतो. यामध्ये ५० प्रश्न असतात. सर्वं ५० प्रश्न अनिर्वाय असतात. याला एकूण १०० गुण असतात. पेपर क्रमांक २ मध्ये एकूण ७५ प्रश्न असतात सर्वं प्रश्न अनिर्वाय असून प्रत्येक प्रश्नाला २ गुण म्हणजे एकूण १५० गुणांचा हा पेपर असतो. सर्वं प्रश्न हे पर्यायी स्वरूपाचे असणार आहेत.

३) अभ्यासक्रम:-

अर्थशास्त्र, मराठी, कॉमर्स, शिक्षणशास्त्र अशा विविध विषयात परीक्षा देता येते. या विषयाचा अभ्यासक्रम आपल्याला http://cbsenet.nic.in/या वर उपलब्ध आहे. अभ्याक्रमातील विविध घटकांचा अभ्यास आपण करायला हवा.अभ्यासाला सुरुवात करण्याआधी अभ्यासक्रम आपल्याला माहीत असावा. यामुळे अभ्यासाची आखणी करणे सोपे जाते.

४) योग्य पर्याय निवड:-

पेपर क्रमांक १, २ आणि ३ या तिन्ही पेपरचे प्रश्न हे पर्यायी स्वरूपाचे असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला ४ पर्याय असतील त्यापैकी योग्य पर्यायाची निवड आपणास करायची आहे. उत्तराचे पर्याय अगदी निश्चित होईपर्यंत उत्तरपत्रिकेवर खुण करू नका. सर्वं पर्यायांचा योग्य विचार करूनच उत्तराची खातरजमा करावी.

५) वेळेचे नियोजन:-

प्रत्येक पेपर साठी वेळेची मर्यादा असते पेपर क्रमांक १ ची वेळ(FOR 22nd JANUARY ,2017) साठी 9.30 AM TO 10.45 AM असणार आहे. तसेच 00 पेपर क्रमांक २ ची वेळ 11.15AM TO 12.30 PM आणि पेपरक्रमांक ३ ची वेळ 2.00PM TO 4.30 PM.असणार आहे. या अनुशंगाने वेळेचे नियोजन करावे. त्यासाठी वेळ लावुन घरी सराव पेपर सोडवावेत.

६) सकारात्मकता:

परीक्षेला सामोरी जाताना नेहमी आपली सकारात्मकता यशाला कारणीभूत ठरते. ही परीक्षा फार कठीण आहे,मी पहिल्या प्रयत्नात पास होणारच नाही. असा विचार न करता. सखोल अभ्यास केल्यास मला यश नक्की मिळेल हे मनात बाळगण गरजेचे असते. आपली साकारात्मकता आपल्याला यशस्वी होण्याच्या मार्गावर कार्यप्रवण ठेवते.

७) संदर्भ पुस्तके :-

नेट परीक्षेच्या पेपर क्रमांक २ आणि ३ साठी विविध पुस्तके उपलब्ध आहेत. फक्त नेट च्या पुस्तकातून अभ्यास नकरता विविध संदर्भ पुस्तकांचा वापर करणे आवश्यक आहे. प्रत्येक घटकाची माहिती ही वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये मिळू शकते. या पुस्तकांच्या वापराने तो घटक आगदी सोपा होऊ शकतो.

८) सराव पेपर:

नेटच्या परीक्षेसाठी असणारे प्रश्न हे पर्यायी असतात. त्यामुळे या पद्धतीसाठी सखोल अभ्यासासोबत सरावाची नितांत आवश्यकता असते. सध्या अनेक पुस्तके सरावासाठी पुस्तकाचा दुकानात आहेत. तसेच विविध WEBSITE वर देखील सराव प्रश्न उपलब्ध आहेत.त्यापैकी www.gopract.com या WEBSITE वरदेखील सरावासाठी प्रश्न आहेत. सराव प्रश्न सोडविण्यासाठी click करा

अशाप्रकारे विषयाचे पूर्ण वाचन करून सारावाव्द्वारे परीक्षेला सामोरे जा यश तुमच्या हातात आहे. त्याला मेहनतीची जोड द्या. 22nd JANUARY 2017 ला होणाऱ्या NET परीक्षेसाठी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा.

Author: Dr. Sukhada Mhatre

Related

Your Comment:
Name :
Comment :
(0) Comments: