तलाठी गट क संवर्गातील 4344 पदांच्या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील 36 जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या तलाठी संवर्गासाठी व मुख्यत्वे पेसा क्षेत्रातील तलाठी पदांसाठी ही भरती आहे.