- Home
- Articles
- MPSC
- इतिहासाची ओळख
इतिहासाची ओळख
इतिहास म्हणजे काय ?
इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व अभ्यास. या शब्दाची व्युत्पत्ती खालीलप्रमाणे सांगितली जाते : इतिहास = इति +ह्+आस = हे असे घडलेआस = हे असे घडले.
प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यांतील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय.
'बर्कहार्ड यांच्या मते 'इतिहास म्हणजे एका युगातील दखल घेता येणाऱ्या घटनांची दुसऱ्या युगाने केलेली नोंद होय.'
१) भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे शास्त्र
भूतकाळातील महत्त्वाच्या सर्व घटनांच्या सुसंगतपणे लिहिलेल्या माहितीला इतिहास म्हणतात.
शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून सुमारे चारशे वर्षापूर्वीचा काळ. यालाच आपण चारशे वर्ष ‘जुना’ किंवा चारशे वर्षापूर्वी ‘होऊन गेलेला’ काळ असेही म्हणू शकतो. आत्ता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर किंवा आज, काल, उद्या; किंवा या वर्षी, पुढील वर्षी इत्यादी शब्दप्रयोग करताना आपल्या नकळत आपण मनातल्या मनात काळ मोजत असतो. या मध्ये ‘आत्ता’ , ‘आज’ ‘या वर्षी’ इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ म्हणजे वर्तमानकाळ. ‘थोड्या वेळापूर्वी’, ‘काल’, ‘गेल्या वर्षी’ इत्यादी शब्द भूतकाळ दर्शवतात. ‘उद्या’, ‘पुढील वर्षी’ इत्यादी शब्दांनी भविष्यकाळ समजतो.
भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात. उदाहरणार्थ, आज आपले वय दहा वर्ष असेल, तर आपल्या जन्माची घटना भूतकाळात दहा वर्षीपूर्वी घडली, असा त्याचा अर्थ होईल. त्याचप्रमाणे दहा वर्षांनी म्हणजे भविष्यकाळात आपले वय वीस वर्ष असेल. आपल्या जन्मादिवासापासून आजपर्यतचा म्हणजे निघून गेलेला काळ हा आपला, म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यातील, भूतकाळ होय.
२) इतिहासाची शास्त्रीय पद्धत
कोणत्याही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर पुन्हापुन्हा तपासून पाहता येणे. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे कि नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात.
भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते. त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे. असे असले, तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपोपग केला जातो.
त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते. हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे. भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले, याचा शोध घेण्यासाठी शास्त्री पद्ध्तीचा उपयोग करतात.
३) इतिहास आणि आपण
शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्र`श्नांची उत्तरे मिळतात. उदा.: पर्यावरणशास्त्र. पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयांचा अभ्यास करते. इतिहास भूतकालातील घटनांचा अभ्यास करतो.
माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामुहिक कृतीच्या परिणामांतून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत आसतो. उदा.:- एखाद्या गावातील लोक एकजुटीने, एकमेकांच्या सहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पडतात. तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो. परंतु गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही, तर मात्र गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. इतिहासाच्या अभ्यामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय, अनिष्ट काय, यांचा अभ्यास करणे शक्य होते. वर्तमानकाळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल , हेही इतिहासाच्या अभ्यासातून समजते.
४) भूतकाळ आणि भविष्यकाळ
भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरूध्द लढा दिला, ही एक ऐतिहासिक कृती आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. असे म्हणता येईल. की स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्यलढा या कृतीचा परिणाम आहे.
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटना घ्या पूर्वी केलेल्या कृतींशी जोडलेल्या असतात. भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवंलबून असतो इतिहासाच्या अभ्यासातून हे आपण शिकतो.
Mr. Krishna Navsupe
MA (History)
Your Comment:
(0) Comments: