Updates

भूगोल : व्दिपकल्पीय पठारी प्रदेश – मध्यवर्ती उच्चभूमी

Geography: व्दिपकल्पीय पठारी प्रदेश – मध्यवर्ती उच्चभूमी

प्राकृतिक रचना

  1. उत्तर भारतीय मैदानांच्या द. सीमेपासून ते नर्मदा दरीच्या प्रदेशाला मध्यवर्ती उच्च भूमी म्हणतात.
  2. प्राचीन भूभागापैकी एक आहे अग्निजन्य आणि रुपांतरीत खडकांनी बनलेला आहे व्दिपकल्पाने भारताच्या एकूण भौगोलिक ३८ टक्के भाग व्यापलेला आहे.
  3. मध्यवर्ती उच्चभूमीची रुंदी पश्चिमकडे अधिक असून पूर्वेकडे कमी होत आहे.
  4. अरवली पर्वतातील माउंट आबू, चंबळ नदीच्या खोल घळ्या अर्थात बिहउ नदीच्या दुतर्फा असलेल्या संगमरवराच्या अरुंद दऱ्या मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशाच्या अतिपूर्वेला असलेला कैमूरचा भित्तीकडा ही लक्षणीय भूस्वरूपे होय.

अरवली पर्वत

  1. भारतालील अतिप्राचीन पर्वतरांग समजली जाते ती नैऋत्यईशान्य दिशेत पसरली आहे नैऋत्यला रुंदी अधिक असून ईशान्ये कडे ती अरुंद होत गेली आहे.
  2. यात आबू आणि अजमेर यांच्यामधील मुख्य भाग डोंगराच्या रुपात आहे येथील सर्वात उंच शिखर गुरुशिखर स्थित आहे
  3. बनास त्तूनी या नदीप्रवाहामुळे डोंगररांगा खूप मोठ्या प्रमाणात झिजली आहे डोंगररांगेचा मधला भाग जास्त अरुंद झाला आहे. त्याचा आकार डमरुसारखा झाला आहे.

पूर्व राजस्थानची उच्चभूमी

  1. अरवली डोंगररांगाच्या पायथ्याकडून पूर्वकडे पूर्व राजस्थानची उच्चभूमी पसरली आहे अरुंद कमी उचीच्या टेकड्या नैऋव्यइशान्य दिशेत पसरल्या आहे. या भागातील सरासरी उंची ३०० मी आहे काही टेकडयांची उंची सुमारे ६०० मी.आहे.
  2. या प्रदेशात बनास नदी वाहते. ती चंबळ नदीची अपनदी आहे. नद्यांच्या प्रवाहामुळे कडेकपारी खालपर्यत कापल्या गेल्या आहे चंबळच्या कडेकपारी बिहड म्हणून ओळखल्या जातात.

बुंदेलखंड

  1. माळवा पठाराच्या ईशान्येला असलेल्या प्रदेशाला बुदेलखंड म्हणतात.
  2. या भागात प्रामुख्याने कणाश्म खडक आढळतो.
  3. यमुना नदीच्या खोऱ्याचा एक भाग बुंदेलखंडाने व्यापला आहे. या भागातून सिंध ही प्रमुख नदी उत्तर दिशेला वाहते आणि यमुनेला जाऊन मिळते

माळवा पठार

  1. मध्यवर्तीय पठाराचा नैऋत्यभाग माळवा पठाराने व्यापला आहे. या पठाराची सरासरी उंची ५०० मी आहे कमी उठाव आणि सलग भूप्रदेश ही याची वेशिष्ट्ये आहे. त्याठिकाणी कमी उंचीच्या टेकडया आहेत.
  2. या प्रदेशातून मही नदी उगम पावते. ती पुढे गुजरात प्रदेशात जाते. तसेच चंबळ व बेटवा या नद्या सुध्दा उगम पावतात त्या उत्तरेकडे वाहतात.

विंध्याचल – बाघेलखंड

  1. बुंदेलखंडाच्या आग्नेयेला आणि माळवा पठाराच्या पूर्वेला असणारा प्रदेश विंध्याचल बाघेलखंड म्हणून ओळखला जातो.
  2. हा टोन्स सोन व त्यांच्या उपनदयांचा प्रदेश आहे.
  3. विंहयाचलचा बहुतांश भाग मध्येप्रदेश राज्यात येतो. त्याच्या पूर्वेकडे बाघेलखंड प्रांत आहे. तो पूर्व भागात आणि छत्तीसगढ राज्याच्या उत्तर भागात पसरला आहे
  4. बाघेलखंड प्रांतातून सोन नदीच्या बहुतेक नद्या उगम पावतात.

छोटा नागपूरचे पठार

  1. छोटा नागपूर पठाराचा बराच मोठा भाग हा झारखंड राज्यात असून या पठाराचा विस्तार पश्चिम बंगाल छतीसगढ आणि ओडिशा राज्यातही झाला आहे.
  2. हे पठार खानिज संपन्न आहे. गोंडवन निर्मित खडकातील उच्चप्रतिच्या कोळशामुळे छोटा नागपूरचा प्रदेश हा खानिजसंपन्न झाला आहे.
  3. पठारांना अलग करणाऱ्या कड्यावरून वाहणाऱ्या जलप्रवाहांमुळे या पठारावर प्रेक्षणीय धबधबे तयार झाले आहे.

विंध्य रांग

  1. विंध्य रांग ही उत्तर आणि दाक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाते तिचा विस्तार मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागापासून ते पूर्वेला बिहार पर्यंत जवळजवळ ११०० कि.मी. आहे
  2. या रांगेत फारशी शिखरे नाहीत.

हवामान

  1. व्दिपकल्पीय पठारी प्रदेश विस्ताराने मोठा असल्यामुळे येथील हवामानात विविथता आढळते.
  2. पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील शुष्क हवामानाचा भाग वगळता भा.थ व्दिपकल्पातील बहुतांश पठारी प्रदेशात उष्णकटीबंधीय आर्द्र व कोरडे हवामान आढळते. हिवाळा कोरडा काळ असतो. उन्हाळा हा खूप उष्ण असतो जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाळा असतो आणि वार्षिक पर्जन्यमान ७५० ते १५०० मि.मी असते.

मृदा

  1. बेसॉल्ट खडकापासून बनलेली काळी मृदा मध्य प्रदेशात आढळते त्यामध्ये चिकणमातीचे प्रमाण अधिक असेत आणि ती ओलावा टिकवून ठेवणारी असते.
  2. लाल मृदा अरवली रांगामध्ये आढळते. या मृदेत नायट्रोजन फॉस्फरसं आणि सेंद्रिय द्रव्ये यांची कमतरता असते आणि लोहभरपूर असते.
  3. अतिपर्जन्य असलेल्या प्रदेशात जांभी मृदा आढळते पावसाच्या पाण्यामुळे घटकद्रव्ये निचरा होऊन निघून जातात. या मृदेत लोहांशा प्रमाण जास्त असते.

नैसर्गिक वनस्पती आणि प्रणीजीवन

  1. नैसर्गिक वनस्पती म्हणजे उष्णकटिबंधीय कोरडी वने होय. यात बाभूळ, पळस हे वृक्ष आढळतात
  2. प्राणी – सांबर, काळवीट, चिकांरा हे प्राणी आढळतात.
  3. गेल्या शतकात वेगाने जंगलतोड झाली आहे त्यामुळे वाळपंटी करण पाण्याचे दुर्भिक्ष या पर्यावरणीय समस्या र्निमाण झाल्या आहे.
  4. येथील वने शुष्क व आर्द्र प्रकारची आहेत. झाडांची उंची सुमारे २५ मी पर्यत असते. बहुतेक बांबुची वने व छोटी झुडपे आढळतात
  5. येथे आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये वाघ, आशियाई हती, बाराशिंगी सांबर, काळवीट, आणि चिंकारा, रानटी कुत्रा, अस्वल इ प्राणी आढळतात तर पक्ष्यांमध्ये सारंग आणि सुतार पक्षी आढळतात.
  6. खाणकाम आणि चरण्या साठी वने साफ केली जातात वयामुळे प्राण्यांना वावरणे कठीण झाले आहे.

लोकसंख्या आणि वसाहती

  1. छत्तीसगड राज्याचा अपवाद वगळता लोकसंख्येची घनता पठारी प्रदेशात २०० ते ५०० व्यक्ती प्रति चौ कि.मी इतकी आहे
  2. या प्रदेशात अनेक जमाती आहे, भिल्ल आणि मिनास या जमाती आहेत, इतर लोसंख्येपेक्षा त्यांच्या बोलीभाषा आणि सामाजिक जीवन अतिशय वेगळे आहे, ते विविध भाषा बोलतात. मारवाड प्रांतात गाडिया लोहार या भटक्या जामातीलील लोक लोहार काम करतात.
  3. इंदौर आणि उज्जैन येथे मराठी बोलणारे लोक आहेत तसेच मोठ्या संख्येने मारवाडी जाट आणि राजपूत या प्रदेशात राहतात.
  4. या भागात मिश्र प्रकारच्या ग्रामीण वसाहती आढळतात.
  5. छोटा नागपूर पठारावर ग्रामीण वसाहतींमध्ये अनेक प्रकार आणि आकृतिबंध दिसून येतात.

आर्थिक विकास

  1. शेती
    1. व्दिकल्पीय पठारावरील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे
    2. कापूस सोयाबीन ही दोन महत्वाची नगदी पिके आहेत. येथे गाहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, कडधान्ये इ. पिकेही घेतली जातात
  2. खाणकाम
    1. भारतातील माळवा पठारावर पांढरा व लाल पाटीचा दगड सापडतो.
    2. पन्ना जिल्हयात हिऱ्याच्या खाणी आहेत. बुंदेल खंडात कणाश्म, वालुकाश्म आणि इतर मौल्यवानदगड आढळतात
    3. छोटा नागपूर पठारावर अभ्रक, बॉक्साइट, तांबे, चुनखडक, लोहसनीज आणि कोळसा या खानिजांचा प्रचंड साठा आहे.
    4. दामोदर खोरे कोळशाच्या खाणीसाठी प्रसिध्द आहे. देशातील कोळशाचे प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून हा प्रदेश ओळखला जातो.
  3. उघोग धंदे
    1. वस्त्रोधोग हा माळवा प्रदेशातील एक प्रमुख उधोग आहे. आदिवासी लोकांसाठी हस्तकलेच्या वस्तू हे उपजीवीकेचे साधन आहे.
    2. रतलामचे लाखकाम, इंदोंर येथे तयार होऱ्याचा बाहुल्या तसेच कागदाच्या लगद्यापासून बनणाऱ्या वस्तू प्रसिध्द आहे.
    3. इंदौरला डिझेल इंजिन तयार करण्याचा मोठा उयोग आहे. तसेच वस्त्रोधोग आणि शेतीवर आधारीत उत्पादनांचे प्रमुख केंद्र आहे.

वाहतूक

  1. मध्यवर्ती उच्चभूमी प्रदेशाच्या भागात बस आणि रेल्वेमार्ग विस्तारलेला आहे.
  2. रेल्वेचे जाळे संपूर्ण प्रदेशभर पसरले आहे.
  3. जबलपूर हे भारतीय रेल्वेच्या पश्चिम – मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे.

पर्यटन

  1. बुदेलखंडमध्ये अनेक किल्ले राजवाडे आणि मंदिरे आहेत
  2. क्षिप्रा नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळयासाठी प्रसिध्द आहे.
  3. अनेक व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत खास करून विदेशी पर्यटकांमध्ये

नैसर्गिक आपत्ती व पर्यावरणीय समस्या

  1. पर्यारणीय समस्या – वृक्षतोड, खाणकाम, औदयोगिकीकरण, विजनिर्मिती, शहरीकरण वाहनांची वर्दळ इ. संबधित आहे.
  2. खाणकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे
  3. या प्रदेशात अनेक औष्णिक प्रकल्प आणि कोळसा प्रकल्प आहेत. त्यातून निघालेले टाकाऊ पदार्थ त्यामुळे जलसाठे प्रदुषित होतात.

सौ. वाणी. एस. सी.
शिक्षिका, संदेश विधालय. विक्रोळी , मुंबई

Useful in : mpsc exam syllabus, mpsc exam, mpsc online test, mpsc online study material, MPSC Tax Assistant, mpsc study material in Marathi, mpsc, mpsc online, mpsc exam, mpsc question paper, mpsc syllabus, mpsc books, UGC NET, SET, MPSC Geography, MPSC Bhugol
Your Comment:
Name :
Comment :
(2) Comments:
L  LAHOTI JUNGADI Commented On: 30-Jun-2017

details madhe maheti kuthe bhetnar

K  KRUTIKA PIMPLE Commented On: 28-Mar-2017

Nice Information Mam......Thnx A Lot Mam...

Upcoming Exam Forms
Gopract App is available now on Play store. Download Android App from Playstore now!
Gopract : Your Exam Prep guide

Download app to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more!

Download App for Gopract Updates!

Subscribe to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more on Whatsapp!

Advertisement

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result