Updates

कशी करावी Law-CET ची तयारी

LAW CET 2026 LLB Courses

महाराष्ट्र विधी CET 2026 – महत्त्वाची सूचना

महाराष्ट्र विधी CET 2026 (LLB 3 Years) चे ऑनलाइन अर्ज 8 जानेवारी 2026 पासून सुरू होऊन 23 जानेवारी 2026 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.

या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अधिकृत Notification, अर्ज प्रक्रिया, hall-ticket, परीक्षा तारीख व इतर महत्त्वाची माहिती खालील लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे:

LLB 3 Years CET 2026 – अधिकृत वेळापत्रक व सूचना

MH LAW CET 2024 चा अभ्यासक्रम व मार्किंग स्कीम समजून घेण्यासाठी खालील लिंक पाहावी:

MH CET LAW अभ्यासक्रम 2024

आपण जर विधी विद्यालयात (LLB) प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला असेल, तर आजच GoPract वर मोफत उपलब्ध असलेले सराव प्रश्न (Free MCQs) सोडवण्यास सुरुवात करा आणि उच्च गुण मिळवण्यासाठी आतापासूनच तयारी करा.

3 वर्षे LLB CET परीक्षा ही 120 गुणांची असून ती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये घेतली जाते. महाराष्ट्र विधी CET संदर्भातील अधिकृत व अद्ययावत माहिती LAW CET च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे – https://cetcell.mahacet.org/

महाराष्टात जवळपास १०००० सीट ५ वर्ष विधी अभ्यासक्रमासाठी व १६००० पेक्षा अधिक ३ वर्ष विधी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध आहेत. भारतात व जागतिक स्तरावर विधी साठी अनेक प्रवेश परीक्षा घेतल्या जातात . परीक्षांद्वारे तुम्ही त्या विद्यालयामध्ये प्रवेशास पात्र ठरू शकता .

विधी प्रवेश परीक्षांची संपूर्ण माहिती

भारत व जागतिक स्तरावरील प्रमुख Law Entrance Exams, पात्रता, परीक्षा पद्धत आणि तयारी मार्गदर्शन

हे वाचा →

पेपरचे स्वरूप :

3 वर्षे LLB CET साठी हा पेपर एकूण 120 गुणांचा असून 120 प्रश्नांचा असतो. तर 5 वर्षे LLB CET साठी हा पेपर एकूण 150 गुणांचा असून 150 प्रश्नांचा असतो.

दोन्ही परीक्षांमध्ये सर्व प्रश्न बहुपर्यायी (Multiple Choice Questions) स्वरूपाचे असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण दिला जातो.

या दोन्ही परीक्षांसाठी एकूण वेळ 2 तास (120 मिनिटे) असतो. वेळेचे योग्य नियोजन केल्यास तुम्ही हा पेपर प्रभावीपणे सोडवू शकता.

विषय:

महाराष्ट्र राज्यातर्फे Law प्रवेशासाठी घेण्यात येणारी CET परीक्षा पेपर खालील विषयामध्ये विभागला जाणार आहे.

तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रम CET चे विषय आणि गुणांचे विभाजन. (updated)

क्र. विषय गुण
1 कायदेविषयक अभिवृत्ती (Legal Aptitude) 24
2 सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (General Knowledge & Current Affairs) 32
3 तार्किक व विश्लेषणात्मक कारणे (Logical & Analytical Reasoning) 24
4 इंग्रजी (English) 40
एकूण 120

पाच वर्षीय पदवी अभ्यासक्रम CET चे विषय आणि गुणांचे विभाजन.

क्र. विषय गुण
1 कायदेविषयक अभिवृत्ती (Legal Aptitude) ४०
2 सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (General Knowledge with Current Affairs) ३०
3 विश्लेषणात्मक कारणे (Logical Reasoning) ४०
4 इंग्रजी (English) ३०
5 सामान्य गणित (Basic Mathematics) १०
एकूण १५०

अशा पद्धतीने वरील विषयांवर आधारित CET चा पेपर असणार आहे. या पेपर च्या सरावासाठी आम्ही काही मराठी माध्यमातील प्रश्न आपल्यासाठी तयार करण्यचा प्रयत्न केला आहे. या प्रश्नांच्या सरावासाठी क्लिक करा LAW सराव परीक्षा

Related

सदर परीक्षेला सकारात्मकतेने सामोरे जा. यश नक्की तुम्हाला मिळेल. या परीक्षेच्या निकालावरून तुमच्या Law अभ्यासक्रमाची सुरुवात होणार आहे. तुम्हाला परीक्षेत यशस्वी होण्यासाठी GOPRACT परिवारातर्फ खूप शुभेच्छा

MH CET Law – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

1. MH CET Law परीक्षा म्हणजे काय?

MH CET Law ही महाराष्ट्र राज्यातील 3 वर्षे आणि 5 वर्षे LLB अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाणारी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे.

2. MH CET Law परीक्षा कोणत्या भाषेत घेतली जाते?

MH CET Law परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये घेतली जाते.

3. MH CET Law 3 वर्षे LLB परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?

3 वर्षे LLB CET मध्ये Legal Aptitude, General Knowledge & Current Affairs, Logical & Analytical Reasoning आणि English हे विषय असतात. एकूण 120 प्रश्न असून परीक्षा कालावधी 120 मिनिटांचा असतो.

4. MH CET Law 5 वर्षे LLB परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?

5 वर्षे LLB CET मध्ये Legal Aptitude, GK & Current Affairs, Logical Reasoning, English आणि Basic Mathematics हे विषय असतात. एकूण प्रश्न 150 आणि वेळ 120 मिनिटे असतो.

5. MH CET Law परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे का?

नाही. MH CET Law परीक्षेत कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे प्रत्येक प्रश्न सोडवणे फायदेशीर ठरते.

6. MH CET Law परीक्षेची तयारी कशी करावी?

परीक्षेची तयारी करताना परीक्षा पॅटर्न समजून घ्या, GK व चालू घडामोडी नियमित वाचा, Legal Aptitude व Logical Reasoning चा सराव करा आणि Daily MCQs व Mock Tests सोडवा.

7. MH CET Law साठी ऑनलाइन सराव कुठे करता येईल?

MH CET Law साठी GoPract.com वर मोफत Daily MCQs, Subject-wise प्रश्नसंच आणि Mock Tests उपलब्ध आहेत.

8. MH CET Law साठी गणित अनिवार्य आहे का?

गणित हा विषय फक्त 5 वर्षे LLB CET साठी आहे. 3 वर्षे LLB CET मध्ये गणिताचा समावेश नाही.

9. MH CET Law परीक्षेचा फॉर्म कधी भरला जातो?

साधारणपणे MH CET Law चा अर्ज फेब्रुवारी ते मार्च दरम्यान सुरू होतो. अचूक तारखांसाठी अधिकृत वेबसाइट पाहावी.

10. MH CET Law साठी GoPract कसा उपयुक्त आहे?

GoPract वर मोफत MCQs, परीक्षाभिमुख प्रश्नसंच आणि मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमातील कंटेंट उपलब्ध असून विद्यार्थ्यांना प्रभावी तयारीस मदत होते.

Labels:law entrance, cet exam, llb entrance exam, lawcet, law entrance exam 2022, Law CET exam 2022

Search MH-CET LAW Books

LLB CET Marathi Books

Your Comment:
Name :
Comment :
(36) Comments:
J  JAYSHRI KAMBLE Commented On: 15-Apr-2024

LLB CET Book marathitun pahije

S  SALIM MAGBUL PATHAN Commented On: 06-Apr-2024

2024 साठी मराठी मध्ये परीक्षा पेपर पाहिजे

A  AKASH Commented On: 07-Mar-2024

LLB CET book मराठी मधुन पाहिजे

P  PRAKASH PATANGE Commented On: 04-Mar-2024

Send me Marathi books

Y  YOGESH PARSHURAM PATIL Commented On: 02-Mar-2024

llb cet chi book marathi madhe pahije

 कविता Commented On: 01-Mar-2024

मराठी बुक्स

 कविता Commented On: 01-Mar-2024

नोट्स

N  NIKITA CHAVAN Commented On: 01-Mar-2024

Thanks

M  MAYURI KUMAVAT Commented On: 23-Feb-2024

Llb CET Book

 अरुण नंद Commented On: 19-Feb-2024

मला सीईटी परीक्षेसाठी मराठीतून पेपर पाहिजे

 अरुण नंद Commented On: 17-Feb-2024

खुपच छान माहिती आहे धन्यवाद

G  GORAKH WAYKAR Commented On: 15-Feb-2024

Learning in law cet syllabus

D  DEEPIKAYASHWANTE Commented On: 15-Feb-2024

Want llb 3 years entrance text book in marathi language

M  MONALI SUBHASH BANE Commented On: 08-Feb-2024

LLB exam ki mararhi book chaiye

K  KASHINATH PAWAR Commented On: 06-Feb-2024

llb3 year cet marathi book

S  SWAPNIL PRAKASH KAMBLE Commented On: 02-Feb-2024

llb cet marathi books 2024

N  NIKITA Commented On: 26-Jan-2024

Good

O  OMPRAKASH PENDOR Commented On: 20-Jan-2024

Muze LLB CET exam ke liye marthi me marthi bookschahiye,

S  SUSHAMA WADHAVAL Commented On: 18-Jan-2024

i want to learn llb cet marathi book

P  PREAGATI PANDURANG NAMBARE Commented On: 13-Jul-2020

muze LLB EXAM ki marathi books chahiye,sirf exam test ke liye

A  AARTI Commented On: 15-Mar-2020

I need for mh law me need law cet question paper in Marathi

M  MADHAV PANCHAL Commented On: 10-Mar-2020

IS THE LAW CET FIVE YEARS COURSE MARATHI BOOKS AVAILABLE IN AURANGABAD CITY (MAH.)

S  SHUBHSM Commented On: 09-Jun-2019

Mala LLB karaychi Ahe mi CET cha from bharala nahi Mala Adamisation bhetel ka..?

R  RISHABH B.DURGE Commented On: 30-May-2019

plz.... provide the 2019 MH low CET mrathi book list

S  SWATI KHOBRAGADE Commented On: 06-May-2017

LLB CET book

M  MONIKA SHINDE Commented On: 02-May-2017

Thanks for sharing law cet questions for practical in marathi.

C  CHETU Commented On: 30-Apr-2017

Mh-cet llb in Marathi this book are available in shop

N  NIKHIL B. KALATE Commented On: 20-Apr-2017

Thanks for sharing law cet questions for practice in marathi

P  PINBALARAM MUNDHEKY Commented On: 28-Jan-2017

please can u tell me CET class available somewhere

H  HEMANT JAGAN GHATAL Commented On: 27-Dec-2016

Very helpful information

R  RAMDAS KALE Commented On: 18-Jun-2016

Very useful.thanks to all team

A  ABHIJEET DHERANGE Commented On: 17-Jun-2016

So helpful ....thank you

D  DEEPAK Commented On: 13-Jun-2016

thanks for providing question paper..

V  VAIBHAVI Commented On: 08-Jun-2016

Thanks

A  AMIT PAWAR Commented On: 07-Jun-2016

how to issue hall ticket....

S  SUNITA Commented On: 05-Jun-2016

Thanks for sharing law cet questions for practice in marathi

Articles

Upcoming Exam Forms
LLB 3 Years CET 2026
Last Date:- Jan 23, 2026
Gopract App is available now on Play store. Download Android App from Playstore now!
Gopract : Your Exam Prep guide

Advertisement

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result