आर्थिक विकास

आज आधुनिकीकरणाच्या काळात आपल्या देशात आर्थिक विकासाला खुप महत्त्व प्राप्त झाले आहे. आज आपल्या देशात होत असलेले डिजिटलाझेशन (Digitization), मेक इन इंडिया (Make in India), स्मार्ड सिटी (Smart City), स्टार्ट अप (Start Ups) यांचा विकास हा आर्थिक विकासाचाच एक भाग आहे. आर्थिक विकास म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्नात वाढ या बरोबर सामाजिक कल्याणात वाढ हा ही आर्थिक विकासाचाच भाग आहे. म्हणून आर्थिक विकास संकल्पना समजणे महत्त्वपूर्ण आहे. पुढे आर्थिक विकासा विषयी काही मते स्पष्ट केली आहेत.

आधुनिकीरणाच्या काळात आज आर्थिक विकासाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अॅडम स्मिथच्या पूर्वकाळा पासून अर्थशास्त्रज्ञ आर्थिक विकासाच्या समस्येच्या वर आपले विचार मांडत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र झालेल्या अल्पविकसीत देशांनी आर्थिक विकासाकडे विशेष लक्ष पुरविलेले दिसते. सर्व देशा मध्ये विकासाची प्रबळ प्रेरणा निर्माण झाली आहे आणि त्या दृष्टीने ते देश प्रयत्नशील आहेत. विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध देश जसे वशांतर्गत प्रयत्न करतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांचे गट क्रियाशील आहेत. एखाद्या ठिकाणाचे दारिद्रय हे अन्य ठिकाणच्या संपन्नतेला धोकादायक ठरू शकते त्यामुळे इंग्लड, अमेरिका या देशांतील गरीब देशाच्या विकासाकडे आपले लक्ष केंद्रित केलेले दिसते.

आर्थिक विकासाच्या संकल्पनेचा अभ्यास करताना तो दोन बाजूने विचारात घेतला जातो.

 1. पारंपारिक दृष्टीकोन :-

  आर्थिक विकास म्हणजे देशाच्या उत्पादन क्षमतेत वाढ होऊन देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात (G.N.P.) किंवा देशी मिश्र उत्पादन (G.D.P.) वाढ होणे होय.

  आर्थिक विकासाच्या प्रकियेत जर विकासाचा दर हा लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा जास्त असेल तर दरडोई उत्पन्नात सुद्धा वाढ घडून येते.

  म्हणून पारंपारिक दृष्टिकोनानुसार आर्थिक विकासाचा संबंध दरडोई राष्ट्रीय उत्पनातील वाढीशी जोडलेला दिसून येतो.

  प्रा. मायर आणि बाल्डविन :-

  आर्थिक विकास ही अशी प्रकिया आहे की, ज्या मध्ये एकाद्या अर्थव्यवस्थेचे वास्तविक दरडोई उत्पन्न दिर्घकाळ पर्यत वाढत जाते. प्रो. मायर आणि बाल्डविन यांच्या व्याख्येवरून आर्थिक विकासाची पुढील तीन वैशिष्टये आहेत.

  1. आर्थिक विकास ही एक प्रकिया आहे:-

   आर्थिक विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. अर्थव्यवस्थेत सतत परिवर्तन होवून देशाचे वास्तविक दरडोई उत्पन्न वाढ, विकासाच्या प्रकियेत भूमी, श्रम, भांडवल, संघटन, नैसर्गिक संसाधने, तंत्रज्ञान इ. आर्थिक घटक किंवा शक्ती कार्यरत त्याच्या सहकार्यातून वस्तू व सेवांची निर्मिती करतात. उत्पादनात सतत वाढ होत जाते.

  2. वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे महत्त्वाचे ठरते:-

   आर्थिक विकासाच्या प्रकियेत मौखिक उत्पनातील वाढी ऐवजी वास्तविक उत्पनातील वाढीचा विचार केला जातो.

  3. दिर्घकालीन प्रक्रिया :-

   उत्पन्न वाढीच्या प्रक्रियांचा विचार दिर्घकाळाच्या संदर्भात केला जातो.

 2. आधुनिक विचार:-

  केवळ देशातील उत्पनातील वाढीमुळे देशाचा विकास घडून येत नसून त्याकरिता दारिद्रय, बेरोजगारी आर्थिक विषमतेवर प्रत्यक्ष ह्ल्लाकरून ते नष्ट करणे गरजेचे आहे. आर्थिक विकासाच्या संकल्पनेची नव्याने मांडणी केली आणि आर्थिक विकासाचा सबंध गरिबी निर्मुलन, आर्थिक समानता आणि रोजगार निर्मितीशी जोडला आहे.

  1. जागतिक बँकेच्या विकासाबाबतचा दृष्टीकोन :-

   जागतिक बँकेच्या मते, आर्थिक विकास म्हणजे मानवाच्या दर्जात वाढ करणे असून ही जीवनमानातील वाढ केवळ उत्पादनातील वाढीमुळे घडून येत नसून त्याकरिता चांगल्या प्रकारचे शिक्षण, उच्च प्रतीचे आरोग्य, पोष्टिक आहार, दारिद्रय निर्मुलन, स्वच्छ हवामान, समान संधी पर्याप्त प्रमाणात व्यक्तिगत स्वातंत्र आणि उच्च दर्जाच्या सांस्कृतिक मूल्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे.

  2. प्रो.मायकेल पी. टोडारो आणि प्रो. एस.सी स्मिथ यांचे विकासाबाबतचे मत:-

   आर्थिक विकास ही बहुआगामी प्रक्रिया असून या प्रक्रियेत, सामाजिक रचनेत मोठ्या प्रमाणात बदल , वास्तववादी प्रवृत्ती, राष्ट्रीय संस्थामध्ये बदल, तसेच आर्थिक वाढीला चालना, आर्थिक विषमता करणे, दारिद्रय निर्मुलन करणे इ. चा अतंर्भाव होतो. तसेच या प्रक्रियेत व्यक्तीच्या आणि समाजाच्या मूलभूत गरजांची आणि इच्छांची पूर्तता होवून त्यांच्या भौतिक व आनंदी जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी संपूर्णता सामाजिक पद्धती मध्ये सार्वत्रिक बदल होणे. आर्थिक विकासामध्ये अभिप्रेत आहे.

  3. अमर्त्य सेन यांचे विकासासाबाबातचे मत:-

   आर्थिक वृद्धी म्हणजे गरजांची पूर्तता नसून मानव जे जीवन जगतो आणि जी स्वातंत्रे उपभोगतो त्यांचा दर्जा वाढवण्याशी विकासाचा सबंध असला पाहिजे. त्याच्या मते, आर्थिक विकासामुळे व्यक्तीच्या क्षमतेत वाढ झाली पाहिजे.

   डॉ. सेन यांचा विकासाचा दृष्टीकोन आरोग्य आणि शिक्षणावर मोठा भर देतो. आर्थिक विकास म्हणजे उत्पनातील वाढी बरोबर व्यक्तिगत स्वातंत्र सर्वाना होऊन त्यांच्या गरजांची पूर्तता होणे होय.

जागतिक विकासाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने संप्टेबर २००० मध्ये सहस्त्र विकासाची ध्येये निश्चित करून ती २०१५ पर्यत पूर्ण करण्याचे ठरविलेले आहे. तेव्हा संपूर्ण जगाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या आर्थिक विकास संकल्पनेचा अर्थ पहिला.आर्थिक विकासात केवळ उत्पादन वाढच नव्हे तर उत्पादन घटक आणि उत्पादन यांच्या रचनेत होणारे बदल, उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानत होणारे बदल, सामाजिक दृष्टीकोन, सांस्कृतिक वातावरण आणि समाजातील विविध संस्थामध्ये होणारे फेर बदल.

थोडक्यात आर्थिक विकास म्हणजे केवळ राष्ट्रीय किंवा दरडोई उत्पन्नात वाढ नसून सामाजिक कल्याणात वाढ होणे म्हणजे आर्थिक विकास होय.

प्रा. अनिल खरचे
M.A. Economics (एम.ए.-अर्थशास्त्र)


Your Comment:
Name :
Comment :
(0) Comments:

Search Bank Exam Books Online