महानिर्मिती सरळसेवा

महानिर्मिती सरळसेवा जाहिरात क्र. ११(SEP) / २०१७

निम्नस्तर लिपिक (मासं) व निम्नस्तर लिपिक (लेखा) या पदांची सरळसेवा भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील निम्नस्तर लिपिक (मासं) व निम्नस्तर लिपिक (लेखा) या पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर सूचना महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या http://www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

जाहिरात

महत्वाच्या तारखा: The tentative Schedule is as follows

ऑनलाईन अर्ज करण्यात कालावधी / On-line registration including Edit/Modification of Application by candidates दिनांक ०१.०९.२०१७ ते दिनांक २२.०९.२०१७
Net Banking व्दारे फि भरण्याचा कालावधी / Payment of Application Fees/Intimation Charges दिनांक ०१.०९.२०१७ ते दिनांक २२.०९.२०१७
ऑनलाईन परीक्षेची तारीख महानिर्मिती कंपनीच्या संकेत स्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.
ई-मेल आयडी/ Email ID hrhelpdesk@mahagrnco.in
ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता अडचण येत असल्यास दूरध्वनी क्रमांक/ Online Application Helpdesk Number ०२२-४२५०४०१८८ / ४२०४०२४०
Official Website http://www.mahagenco.in/
Registration Official Website Registration for महानिर्मिती सरळसेवा

१. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्युत केंद्रातील तसेच सांघिक कार्यालय, मुंबई येथील निम्नस्तर लिपिक (मासं) व निम्नस्तर लिपिक (लेखी) यांची रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाव्दारे भरावयाची आहेत.

२. उपरोक्त पदांसाठी विहित केलेली वेतनश्रेणी/ शैक्षणिक अर्हता / अनुभव / वयोमर्यादा इत्यादीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. पदाचे नाव व वेतनश्रेणी शैक्षणिक अर्हता अनुभव
१. निम्नस्तर लिपिक (मासं) Lower Divisional Clerk (HR)वेतनश्रेणी :- ११२७५-२७५-१२६५०-३६०-१६३५०-४१०-२८२४० 1. Degree in Arts, Science, Commerce or Management/Administration from a University recognized by the UGC 2. MS-CIT exam Passed. NIL
२. निम्नस्तर लिपिक (लेखी) Lower Divisional Clerk (Account) वेतनश्रेणी :- ११२७५-२७५-१२६५०-३६०-१६३५०-४१०-२८२४० 1. B.com 2. MS-CIT exam Passed NIL

उमेदवारांना इतर महत्वाच्या सूचना:

१. उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत आवश्यक आहे याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.

२. उमेदवार महाराष्ट्र राज्याच्या अधिवासी असावा. तसेच उमेदवाराजवळ महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याबाबतचे स्वत:च्या नावे असलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) जाहिरातीस अनुसरून कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकापूर्वी प्राप्त केलेले व कागदपत्र पडताळणीच्या दिवशी वैध असलेले उपलब्ध असणे आवश्क आहे.

ऑनलाईन परीक्षा विषय

मराठी भाषा
इंग्रजी भाषा
गणित (इयत्ता १० वी च्या पातळीचे)
संगणकीय ज्ञान
सामान्य ज्ञान

निवड पद्धती:

१. जाहिरातीस अनुसरून पात्र झालेल्या अर्जदार उमेदवाराची चाळणी करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.

२. उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा ही मराठी भाषा,इंग्रजी भाषा,गणित (इयत्ता १० वी च्या पातळीचे), संगणकीय ज्ञान, सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित असेल. ऑनलाईन परीक्षा ही एकूण १०० गुणांची असेल व चुकीच्या उत्तरांकरीता गुण कमी करण्याचे (Negative Marking) पद्धत अवलंबिली जाणार नाही.

३. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांनुसार तसेच जाहिरातीमध्ये दर्शविण्यात आलेल्या रिक्त जागांनुसार सामाजिक आणि समांतर आरक्षण विचारात तात्पुरत्या निवड सूची यादीकरिता पात्र ठरणा-या उमेदवाराची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पार पाडण्यात येईल. सदरची तात्पुरती निवड सूची कंपनीच्या www.mahagenco.in या संकेत स्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता उपलब्ध करून देण्यात येईल.

४. कागदपत्रांच्या पूर्ण छाननीनंतरच तसेच शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर आवश्क अटी व शर्ती पूर्ततेच्या अधीच राहूनच उमेदवाराच्या निवडीबाबतची कार्यवाही पार पाडण्यात येईल.

५. उमेदवारांकडून मागणी केल्यानंतर सादर केलेल्या अर्जाची सविस्तर छाननी निवडसूची बनवित वेळी केली जाईल. ऑनलाईन अर्जामध्ये दर्शविलेल्या माहिती पृष्टयर्थ योग्य ते दस्तऐवाज सादर करणे ही सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी राहील. अन्यथा त्यांची निवड रद्द करण्यात येईल.

६. तात्पुरती निवड सूची यादी तयार करताना खुल्या (open) प्रवर्गातील निवडीकरिता ४० गुणांचा व मागास प्रवर्गातील (Backward Class) निवडीकरिता ३० गुणांचा निकष (Cut-off) ठेवण्यात आलेला आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

७. निवडसूची बनवितांना ज्या उमेदवारांचे एकूण गुण समान असतील तर सादर उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेऊन त्यांच्यातील ज्येष्ठताक्रम ठरविण्यात येईल.

८. निवड झालेल्या उमेदवारांनी अर्जामध्ये दर्शविलेली त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, अनुभव व ईतर सर्व बाबी इत्यादी सिद्ध करणे ही सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी राहील. यापैकी कोणतीही बाब उमेदवार सिद्ध करू न शकल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल. सदर बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार घेतला जाणार नाही.

९. दस्तऐवज सादर करण्याच्या कालावधीमध्ये उमेदवाराने दस्तऐवज सादर न केल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

१०. निम्नस्तर लिपिक (मासं) व निम्नस्तर लिपिक (लेखा) या पदांच्या निवड पद्धतीत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार महानिर्मिती कंपनी राखून ठेवीत आहे.

Advertisement

Your Comment:
Name :
Comment :
(0) Comments:
Upcoming Exam Forms
Gopract App is available now on Play store. Download Android App from Playstore now!
Gopract : Your Exam Prep guide

Download app to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more!

Download App for Gopract Updates!

Subscribe to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more on Whatsapp!

Advertisement

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result