सेट परीक्षेला सामोरे जाताना.........


सध्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारा प्रत्येक व्यक्ती सेट (SET) परीक्षा उर्त्तीर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) येत्या २९ मे २०१६ या दिवशी महाराष्ट्र, गोवा राज्यात घेण्यात येणार आहे. तुमचे फार्म भरून झालेले आहेत. शेवटचे काही दिवस आता अभ्यासासाठी राहिलेले आहेत. सगळयांच्या म्हणण्या नुसार सेट परीक्षेचा निकाल अगदी काही टक्कांमध्ये लागतो म्हणजे, ही परीक्षा कठीणच असे आपण मनाशी ठरवितो आणि अभ्यास करतो परंतू मला वाटते, काही टक्के पास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आपणच असणार असा विचार करून आपण अभ्यासाला लागलो तर, आपण नक्की पास होऊ खरतर हाच विचार करून मी ६ सप्टेंबर २०१५ या सेट परीक्षेला शिक्षणशास्त्र या विषयातून बसले आणि त्या परीक्षेला उत्तीर्ण देखील झाले. म्हणून माझे काही अनुभव मी तुमच्यासोबत शेर करीत आहे.

सेट परीक्षा ही एकूण ३२ विषयांमध्ये घेतली जाते. तुमचा Post-graduation जो विषय असेल त्याविषयात तुम्ही Set परीक्षा देऊ शकता. यात एकूण ३ पेपरला अपल्याला सामोरे जायचे असते. नवीन नियामानुसार हे ३ पेपर Objective (वस्तुनिष्ठ) प्रकारचे असतात. पहिला पेपर हा सर्वांनसाठी सारखा असतो. त्यात एकूण ६० प्रश्न असतात त्यापैकी आपल्याला ५० प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला २ गुण असे १०० मार्क्स पूर्ण पेपर साठी असतात. यातआपण काय करतो ६० पैकी ६० प्रश्न सोडवतो आणि विचार करतो कोणतेही ५० प्रश्न बरोबर येतील त्यांना गुण मिळतील पण पेपरच्या सुरवातीला दिलेल्या सूचनेकडे आपण दुर्लक्ष करतो आपण सोडवलेल्या प्रश्नापैकी सुरवातीचे ५० प्रश्न तपासले जातात म्हणून या पेपर मध्ये आपल्याला येणारे ५० प्रश्न सोडवलेत तर नक्कीच या पेपर मध्ये तुम्ही जास्तीत जास्त गुण संपादित करु शकता. या पेपर साठी आपल्याकडे पूर्ण १ तास १५ मि. वेळ असतो म्हणजे प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याकडे १ ते १.२० मिनिटे असतात आणि सुरवातीच्या १० मिनिटात आपण पूर्ण पेपर वाचून कोणते प्रश्न सोडवायचे हे निश्चित करु शकतो. हा पेपर सोडविण्यासाठी सरावाची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर काही क्लुप्त्या लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

पेपर क्रमांक २ आणि ३ हा तुम्ही निवडलेल्या विषयावर आधारित असतो. हे पेपर सोडविण्यासाठी आपल्या विषयाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांवर आधारित अनेक प्रश्न यात असतात. प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम website वर दिलेला आहे. त्या अभ्यासक्रमानुसार काळजीपूर्वक वाचन केल्यास हे दोन्ही पेपर सोडविणे सोपे जाते. पेपर क्रमांक २ हा १०० गुणांचा असतो. म्हणजेच त्यातले ५० प्रश्न सोडवायचे असतात. त्यासाठी १.१५ मि. वेळ देण्यात आलेली असते आणि पेपर क्रमांक ३ हा १५० गुणांचा असतो. एकूण ७५ प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात २.३० तासाचा वेळ आपल्याकडे असतो. प्रत्येक प्रश्नाच्या योग्य पर्याचा विचार करण्यासाठी वेळ आपल्याकडे असतो. पेपर लवकर देण्याची घाई न करता मिळालेला पूर्ण वेळ वापरून पर्यायांचा योग्य विचार करून हा पेपर सोडवावा.

या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला OMR Sheet दिली जाते. त्यामध्ये प्रश्नक्रमांका समोरील योग्य पर्यायावर खूण करायची असते. यासाठी तुम्ही काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरू शकता पण पेन्सिलचा वापर करू नका.

MH SET 2016 OMR Sheet

वर दाखविल्याप्रमाणे योग्य पर्याय समोर खूण करणे गरजेचे आहे. पण पर्याय निवडताना योग्य विचार करून खूण करावी एकदा केलेली खूण दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे थोडावेळ घ्या पण योग्य पर्याय निवडा.

अशा प्रकरे ३ ही पेपर विचारार्थी सोडविल्यास निकालाची प्रतिक्षा आपण सकारात्मक दृष्टीने करू शकतो. परीक्षागृहातून बाहेर पडताना आपण आपल्या सोबत Text Book of Paper I, II, III आणि Duplicate copy of OMR Sheet घेऊ शकतो. ज्यावेळेस विद्यापीठ मॉडेल अन्सर शिट वेबसाईट वर टाकतात. त्यावेळेस आपण आपली उत्तरे तपासू शकतो.

बऱ्याच बाबी तुम्हाला संगितल्या पण एक जरूर लक्षात ठेवा फक्त अनुभव म्हणून पहिल्यांदा परीक्षेला बसतो पास होण नतंर पाहू अशा विचाराने ही परीक्षा देऊ नका. खूप मेहनत घ्या, सखोल आणि मुद्देसूद अभ्यास करा यश नक्कीच तुमच्या सोबतीला असेल. सकारात्मक विचाराने परीक्षेला सामोरे जा म्हणजे पहा तुमच्या परीक्षेचा येणार निकाल देखील सकारात्मक असेल. २९ मे २०१६ रोजी होणाऱ्या सेट परीक्षेसाठी माझ्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. काही प्रश्न असल्यास comment मधून तुम्ही माझ्याशी नक्की संवाद साधा.


डॉ. सुखदा म्हात्रे

प्राचार्य, राजीव गांधी नाईट कॉलेज ऑफ आर्टस अॅण्ड कॉमर्स

Search MH SET Books

Search MH SET Marathi Books

Your Comment:
Name :
Comment :
(5) Comments:
G  GOPRACT Commented On: 01-Sep-2016

Dear Sidhaji,
If you have completed M.SC Chemistry then you can go for SET with Chemistry as a subject, for that you must fulfil the criteria of minimum marks 55% (for General) and 50 % for reserved category in graduation.
And if you still appearing for M.SC. then your SET result will be on held until you submit your Passing certificate with minimum marks criteria.

S  SIDHAJI MASHALE Commented On: 26-Aug-2016

I am studied at m.sc chemistry then what I do taking set exam

B  BIBHISHA RAGHU DAMARE Commented On: 15-Aug-2016

Sir , set may 2016 result kevva aahe

R  RUSHIKESH SHINDE Commented On: 05-Aug-2016

10

S  SANEER KAWHANE Commented On: 06-Jun-2016

I like it